Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कच्च्या बटाट्याचे चविष्ट कबाब

Webdunia
सोमवार, 10 मे 2021 (18:03 IST)
कधी कधी घरात काही भाजी बनवायला नसते आणि खाण्यासाठी काही वेगळं करायचे असेल तर घरच्या घरात असलेल्या साहित्याने आपण कच्च्या बटाट्याचे कबाब करू शकतो. ही रेसिपी आपणास नक्की आवडेल.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य-
 
1/2 कप मैदा,1 कप पोहे,4-5 कच्चे बटाटे, 2 कांदे ,2 हिरव्या मिरच्या,2 चमचे धणेपूड,2 चमचे जिरेपूड,2 चमचे चिली फ्लेक्स,1 लहान चमचा आमसूलपूड,तळण्यासाठी तेल.
 
कृती-
सर्वप्रथम बटाटे किसून थंड पाण्यात घालून ठेवा.कांदे आणि हिरव्यामिरच्या बारीक करून घ्या.पोहे धुवून ठेवा.बटाट्यातून जास्तीचे पाणी काढून घ्या.सर्व मसाले एकत्र मिसळा पोहे मॅश करून घ्या.
आता एका भांड्यात पोहे,बटाटे,कांदा,मिरच्या,मैदा,मसाले एकत्र करा आणि मिसळून घ्या पाणी कमी असल्यास थोडं पाणी घाला. पाणी जास्त असल्यास मैदा मिसळा.सर्व साहित्य मिसळून झाल्यावर त्याला कबाब चा आकार द्या आणि गॅस वर कढई तापत ठेवा त्यामध्ये तेल घाला तेल गरम झाल्यावर हे तयार कबाब त्यात सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. तळलेले तयार कबाब हिरव्या चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

उन्हाळयात बनवा थंडगार रेसिपी Chocolate Ice Cream

नारळाच्या पाण्यात या गोष्टी मिसळून प्या, दुपट्ट फायदे होतील

उन्हाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर पुरळ येतात, हे उपाय अवलंबवा

पोटाच्या प्रत्येक समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय करा

सायटिकाचा त्रास होत असेल तर दररोज हे 4 योगासन करा

पुढील लेख
Show comments