सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे. संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये काय खावे हे समजत नाही या साठी आम्ही सांगत आहोत आरोग्यवर्धक नारळाचे चिप्स हे पचायला सोपे आहेत. चवदार आहे आणि आरोग्यदायी आहेत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
नारळाचा तपकिरी भाग वेगळा करून घ्या. ह्याचे पातळ चिप्स तयार करा. ओव्हन 180 डिग्री पर्यंत गरम करा. एका भांड्यात मध,गरम पाणी आणि नारळाचे पातळ चिप्स घाला. नंतर चांगले मिसळा. बेकिंग ट्रे वर मध आणि नारळाच्या तेलात गुंडाळून हे चिप्स पसरवून घ्या. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये ठेवा. 10 ते 15 मिनिटातच हे खमंग सोनेरी आणि कुरकुरीत होतील. काढून हवाबंद डब्यात ठेवू शकता. खायचे असल्यास वरून तिखट, दालचिनी पूड घालून खाण्याचा आनंद घ्या.