भारतामध्ये भात हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. अनेक घरांमध्ये रोज भात बनवला जातो. पण अनेक वेळेस प्रमाण चुकल्याने भात जास्त बनतो व उरतो. तर अनेक जण शिळा भात खायला नको म्हणून टाकून देतात. तर आता भात टाकू नका त्यापासून बनवा चॉकलेट केक, तर जाणून घ्या रेसिपी उरलेल्या भातापासून चॉकलेट केक कसा बनवावा.
साहित्य-
भात
चॉकलेट
तूप
बटर पेपर
चॉकलेट सिरप
केक मोल्ड
कृती-
भाताचा केक बनवण्याआधी चॉक्लेटला मेल्ट करावे. याकरिता एका पातेलीत पाणी गरम करण्यासाठी ठेवावे. जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा एका दुसऱ्या पातेलीमध्ये चॉकलेट ठेवावे आणि उकळत्या पाण्यावर ठेऊन चॉकलेट मेल्ट करावे. चॉकलेट मेल्ट करतांना हलवत राहावे.
आता उरलेला भात आणि मेल्टेड चॉकलेट ने आपण एक बॅटर तयार करून घेऊ या. याकरिता भात आणि चॉकलेट एकत्रित करून त्यामध्ये गरम पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्यावे.
यानंतर केक मोल्ड घ्या आणि त्याला तूप लावावे.
ग्रीस केल्यानंतर मोल्डला बटर पेपरने कव्हर करावे. आता त्यामध्ये तयार केलेले बॅटर घालावे. व तीन ते चार तासांकरिता फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे. नंतर बाहेर काढून चॉकलेट सिरपने सजवावे. तर चला तुमचा चॉकलेट केस तयार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.