rashifal-2026

वाटली डाळ: चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा, जाणून घ्या सोपी कृती

Webdunia
शनिवार, 28 मार्च 2020 (10:41 IST)
साहित्य- 250 ग्राम (चणा) हरभरा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, हळद, तिखट, मीठ, हिंग, 1/2 किसलेली कैरी, 1/2 वाटी ताक किंवा दही, किसलेलं खोबरं, तेल, मोहऱ्या (फोडणीसाठी). 
 
कृती- हरभरा डाळ स्वच्छ धुऊन 4 -5 तास भिजत ठेवावी. त्यातले सर्व पाणी काढून त्याला मिक्सरच्या पात्रात डाळ, कैरी, आलं, जिरे, हिरव्या मिरच्या टाकून आणि गरजे पुरतं ताक टाकून वाटून घ्यावं. ही वाटलेली डाळ एका पात्रात काढून त्यात तिखट, मीठ, साखर (चवीला) टाकावे. 
कढईत फोडणीसाठी तेल गरम करून मोहऱ्या, हिंग घालावे. त्यात वाटलेली डाळ, हळद टाकून परतावी. झाकण ठेवून डाळीला वाफ द्यावी. डाळ मोकळी झाल्यावर खोबऱ्याचा बुरा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम डाळ सर्व्ह करावी.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा

थंडीत आरोग्याची काळजी घ्या, या 5 टिप्स वापरून पहा

रात्रभरात भेगा पडलेल्या टाचा कशा बऱ्या करायच्या? हा उपाय तुमच्या टाचांना कमालीचा मऊ करेल

प्रेम व्यक्त करण्यासाठी या प्रपोजल टिप्स फॉलो करा

हिवाळ्यात शेकोटी जीवघेणी ठरू शकते; थोडीशी निष्काळजीपणाही महागात पडू शकते.

पुढील लेख
Show comments