Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tasty And Delicious Vada Pav Recipe - चविष्ट वडा पाव रेसिपी

vada pav
Webdunia
मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (08:43 IST)
महाराष्ट्रात वडा पाव मोठ्या आवडीने खातात. ह्याला बटाटा वडा देखील म्हणतात, ज्याला दोन पावांमध्ये ठेवतात. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत हा सर्वांचा आवडता नाश्ता आहे आणि आता तुम्हीही ही आवडती डिश फक्त 20 मिनिटांत घरी बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य: 
लादीपाव, 4मोठे बटाटे, 5 हिरव्या मिरच्या, एक चमचा आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू ,तळण्यासाठी तेल,
फोडणीचं साहित्य – 2 टिस्पून तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद
आवरणासाठी – 1 कप चणाडाळीचं पिठ, आवश्यकतेनुसार पाणी, 1/2 टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
 
कृती :-
बटाटे शिजवून मॅश करुन घ्यावे. गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं -लसूण पेस्ट घालावी. नंतर त्यात बटाटा घालून मंद आचेवर परतून घ्यावं. मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावं. शेवटी थोडा लिंबूरस घालावा. भाजी थंड होण्यासाठी ठेवावी.
आवरणासाठी बेसनात मीठ, हळद, किंचित सोडा घालून भिजवून घ्यावे. 
 
थंड झाल्यावर मिश्रणाचे छोटे गोळे करावे. कढईमध्ये तेल तापून घ्यावं आणि भिजवलेल्या बेसन पिठात तयार गोळे बुडवून तेलात तळून घ्यावे. तळून झाल्यावर पाव मधोमध उभा कापून त्यामध्ये लसणाची लाल चटणी लावून आणि वडा ठेवून सर्व्ह करावे.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

चिकू मिल्कशेक रेसिपी

Career in M.Tech ECE : एमटेक इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये करिअर

उन्हाळ्यात कच्च्या पपईचा रस पिण्याचे फायदे जाणून घ्या

हे 5 केसांचे तेल सुंदर आणि निरोगी केसांचे शत्रू आहेत, वापरणे टाळा

Good Friday Special Recipe फिश करी

पुढील लेख
Show comments