Marathi Biodata Maker

उकडीचे मोदक

Webdunia
साहित्य : एक वाटी स्वच्छ तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली पिठी, एक वाटी साखर किंवा गूळ, एक नारळ, दोन चमचे तूप, वेलची पूड, तेल, आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड.
 
सारण: खोवलेल्या नारळाच्या चवात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हालवावे व भांड्याच्या तळाला चिकटू देऊ नये. शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हालवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.
 
उकड : जितकी तांदळाची पिठी, तितकेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेऊन त्यात पिठी घालून हालवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.
 
मोदक : या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नऊ अशा पाडाव्यात. काही जणी आपल्या आवडीनुसार आधी कळ्यापाडून नंतर सारण भरतात. हे तयार केलेले मोदक थोड्या पाण्यात बुडवून एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

Guava Candy पेरू पासून बनवा गोड, चविष्ट आणि आरोग्यदायी कँडी

Sunday Born Baby Boy Names रविवारी जन्मलेल्या मुलांसाठी सूर्यदेवाशी संबंधित युनिक आणि अर्थपूर्ण नावे

ओमेगा 3 फॅटी अॅसिड या पदार्थातून देखील मिळते, आहारात समाविष्ट करा

बॅचलर ऑफ बिझनेस एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट करून करिअर बनवा

पुढील लेख
Show comments