वडा पाव हा मुंबईचा लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, मुंबईचे लोक वडा पाव मोठ्या आवडीने खातात. तसे, हा एक बटाटा वडा आहे, ज्याला दोन पावांमध्ये ठेवण्यात येतं. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत हा सर्वांचा आवडता नाश्ता आहे आणि आता तुम्हीही ही आवडती डिश फक्त 20 मिनिटांत घरी बनवू शकता.
साहित्य: पावलादी, ४ मोठे बटाटे, ५ हिरव्या मिरच्या, एक चमचा आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू ,तळण्यासाठी तेल,
फोडणीचं साहित्य – २ टिस्पून तेल, मोहोरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद
बटाटे शिजवून मॅश करुन घ्यावे. गॅसवर कढई ठेवून २ चमचे तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट घालावी. नंतर त्यात बटाटा घालून मंद आचेवर परतून घ्यावं. मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावं. शेवटी थोडा लिंबूरस घालावा. भाजी थंड होण्यासाठी ठेवावी.
आवरणासाठी बेसनात मीठ, हळद, किंचित सोडा घालून भिजवून घ्यावे.
थंड झाल्यावर मिश्रणाचे छोटे गोळे करावे. कढईमध्ये तेल तापून घ्यावं आणि भिजवलेल्या बेसन पिठात तयार गोळे बुडवून तेलात तळून घ्यावे. तळून झाल्यावर पाव मधोमध उभा कापून त्यामध्ये लसणाची लाल चटणी लावून आणि वडा ठेवून सर्व्ह करावे.