Marathi Biodata Maker

कोथिंबिरीचा झुणका

Webdunia
रविवार, 23 नोव्हेंबर 2014 (05:40 IST)
साहित्य :  कोथिंबीर एक जुडी, हरभरा डाळ एक वाटी, कांदे दोन मोठे, लसूण कांदा एक, हिरव्या मिरच्या पाच-सहा, तेल पळीभर, हळद अर्धा चमचा, धने एक चमचा, जिरं एक चमचा, चवीनुसार मीठ .
 
कृती :- कोथिंबीरीच्या जाड काडया काढून ती बारीक चिरून, धुऊन निथळून घ्यावी. डाळ तीन तास आधी भिजत घालावी आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटावी. वाटताना त्यामध्ये लसूण, धने, जिरं आणि चमचाभर मीठ टाकावं. वाटलेलं मिश्रण हळद घालून कोथिंबीरीमध्ये एकजीव करावं. कांदा उभा पण जाडसर चिरावा. जिरं-मोहरीची फोडणी करून कांदा घालावा. कांदा बदामी रंगाचा झाल्यावर एकजीव केलेलं मिश्रण घालावं. अलगद हलवावं. पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी. नंतर परत अलगद हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता शिजू दयावी. झुणका गरम असतानाच भाकरी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

Show comments