suvichar

चुंदा

Webdunia
ND
साहित्य : खोबरी जातीच्या कैर्‍या, हळद, मीठ, लाल तिखट, साखर किंवा गूळ, जिरे.

कृती : कैर्‍यांची साल पूर्णपणे काढून त्या स्टेनलेस् स्टीलच्या किंवा पितळेच्या जाड किसणीने किसाव्यात. किसाला मीठ व हळद लावून एक ते दोन तास ठेवावे. त्याला पाणी सुटते. नंतर तो कीस हातात झेलून जेवढे निघेल तेवढेच पाणी काढावे. त्यानंतर एक वाटी किसाला दोन वाट्या साखर अथवा गूळ या प्रमाणात घेऊन ती साखर किंवा गूळ त्या किसात घालावा. आपल्याला कमी किंवा जास्त गोड हवे असेल, त्याप्रमाणे कमी किंवा जास्त साखर अथवा गूळ घालावा.

नंतर एका उत्तम कल्हईच्या किंवा स्टेनलेस् स्टीलच्या पातेल्यात तो कीस घालून, पातेल्याचे तोंड फडक्याने घट्ट बांधून, ते पातेले चांगल्या उन्हात आठ दिवस ठेवावे. रोज सकाळी एकदा ते मिश्रण हालवावे. आठ दिवस झाल्यावर एक वाटी किसाला दोन चमचे लाल तिखट व जरा जाडसर कुटलेले जिरे एक चमचा या प्रमाणात घालावे. पुन्हा दोन दिवस ते पातेले फडके बांधून ठेवावे. नंतर बरणीत तो चूड भरावा. हे लोणचे वर्षभर टिकते. या चुड्यात हळद न घातल्यास हा चुंदा उपवासालाही चालते.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Spicy Paneer Pulao अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी डिश

जागतिक मलेरिया जागरूकता दिन २०२६: कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध

एलआयसी एचएफएलतर्फे १८० ज्युनियर असिस्टंट पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

टॅनिंग काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

गरोदरपणात तुम्हाला ही ६ लक्षणे आढळल्यास काळजी घ्या

Show comments