suvichar

नागपंचमी स्पेशल ‍रेसिपी

Webdunia
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, भाज्या चिरत नाही, तवा चुलीवर ठेवत नाही, असे काही नियम पाळत असतात. अशात या दिवशी जेवायला काही तरी वेगळं आणि स्वादिष्ट करायला हवं हे ही तेवढंच खरं. मग पाहू या जर तवा वापरायचा नाही तर ह्या नागपंचमीला आपण स्वयंपाकात काय स्वादिष्ट डिश तयार करू शकता...
 
डाळ बाटी (दाल बाटी)
साहित्य: एक किलो गव्हाचे जाडं पीठ, 1 टेबलस्पून दही, मीठ चवीप्रमाणे, तेल (मोहन), सोडा, हळद, 1 वाटी तूर डाळ, फोडणीचे साहित्य.


 
कृती: बाटी बनविण्यासाठी परातीत गव्हाचे जाडं पीठ, दही, मीठ, चिमूटभर सोडा, थोडीशी हळद आणि मोहन टाकून कोमट पाण्याने घट्ट मळून घ्या. लाडू एवढ्या आकाराचे गोळे तयार करून त्यांना 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या. (उकळलेल्या पाण्यात गोळे टाकून वर येईपर्यंत शिजवू पण शकता.) बाट्या बाहेर काढून 5 मिनिटे तसेच राहून द्या. ओव्हन गरम करून किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून बाट्या दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या. शेकून झाल्या की थोडं गार होऊ द्या, मग हाताने तोडून त्यात भरपूर साजुक तूप घाला. आपल्या आवडीप्रमाणे तूर डाळची आमटी तयार करून त्याबरोबर बाटी सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

नौतपाच्या कडक उन्हात ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाश्त्यामध्ये खास आरोग्यदायी रेसिपी

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

पुढील लेख
Show comments