कृती: कढईत तेल गरम करून आलं-लसूण परता. कांदा घालून ब्राऊन होयपर्यंत परता. लाल तिखट, टोमॅटो, मीठ घाला. गार होऊ द्या. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून हळद, लाल तिखट घालून बटाट्याचे तुकडे घाला. शिजू द्या. कांदा-टोमॅटोची प्युरी घाला. पाणी घाला. उकळी येऊ द्या. सर्व मसाले आणि मीठ घाला. सर्व भाज्या घाला. शिजू द्या. तयार भाजीवर वरून तेलाची झणझणीत फोडणी ओता. सर्व्ह करा.