Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपेक्षित नारी

सौ. स्वाती दांडेकर

Webdunia
ND
मी एक उपेक्षित नारी समाजाची
आपल्या पोटाची भूख भागविण्या साठी
करते शांत भूख रोज दुसर्‍याची ।।1। ।

असले मी किती उपेक्षित जरी
तुमच्या ह्या शुभ्र समाजासाठी
काळे डाग त्याचे मीच लपविले
पोर्णिमेच्या रात्रीत ही ।।2।।

घाव माझ्या अंतरीच े
कसे दाखवु तुम्हा ते
व्यथा माझ्या जीवनाची
बनते कहाणी तुमच्या मासिकाची
सोडुनी एक उसासा माझ्या साठी
बिचारी म्हणुन संपते गोष्ट माझ्या जीवनाची ।।3। ।

नचरेचे बाण सोसते अंगावरी
स्पर्शाने सरसरते काया माझी
शाब्दीक मार सहन करते हृदयावरी
मृत मन, बधीर तन,
घेऊन रोज मरते, रोज जगते
द्रोपदी मी कलियुगाची,
निज, आस असते एक कृष्णाची ।।4।।

वंशवेल वाढवते अज्ञान पित्याच ी
कोणते नांव देऊ मुलांस मी
आंधळी कोशिंबीर खेळतात हे जीवनाशी
वारसा देते त्यांना एक
निराश्रीत जीवनाचा
इच्छा असे मानसी बनु सावली वट वृक्षाची ।।5। ।

कहाणी नाही ही माझ्या एकटीची
असे अनेक माझ्या भगिनीची
मागणे एक ह्या सुसंकृत समाजाशी
घ्या पुढार आमच्या साठी
मायेच्या कुशीत घ्या माझ्या लेकरांना
शुभ्र आरसा त्यांना बनु द्या
प्रतिंबिंब असो त्यांच्याच सारखे
हेच सांगुन माझी कहाणी संपवते
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Show comments