Festival Posters

प्रश्न हे अनुत्तरीत

(महिला दिनानिमित्त विशेष लेख...)

वेबदुनिया
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणून महिला दिन साजरा करण्याचे ठरले. वरकर्णी पहता त्यात चुकीचे असे काही नाही, पण तरीही काही प्रश्न पडतात अन् ते कधी कधी अनुत्तरीतच राहतात. प्रश्न अगदी साधे, सोपे, रोजच्याच जगण्यातले, पण विचार करायला लावणारे.....
महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत? 
 
ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही? 
 
अजूनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्‍यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. राजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारीरिक अवहेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणार्‍या महिलांसाठी आपण आता तरी सेफ झोन तया करणार आहोत की नाही? 
 
दिल्लीच्या निर्भयापासून ते भंडारा जिल्ह्यातील तीन चिमुकल्या बहिणींवर बलात्कारच्या घटना मिडियातधून येत असताना या महिलादिनाची उपयुक्तता आरि यशस्विता यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे राहत? 
 
देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच त्या नको म्हणून तिला मारून टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना या हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी मदत करायला नको का? 
 
सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रियांना भेडसावणारी आणि बहुसंख्य वेळा दाबून टाकली जाणारी लैंगिक शोषणाची समस्या अजूनही तेवढीत बिकट आहे. बहुसंक्य वेळा मानसिक त्रासाला कंटाळून स्त्रियांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी गुन्हेगार तसेच मोकाट फिरत असतात. असे हजारो प्रश्न आहेत. त्यांचे गांभीर्य व त्यानिमित्ताने त्यातून स्त्रियांचे आयुष्य सुखकर होण्याकरिता आपण काही विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत?
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

पौराणिक कथा : होलिका आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट

Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

होळीचा रंग डोळ्यांत गेल्यास या चुका टाळा Eyes Safety Tips During Holi

Holi Dahan 2026 होळी दहन करतांना अर्पण केला जाणारा मुख्य नैवेद्य

४० वर्षांच्या वयातही प्रजनन क्षमता कायम राहील, Ovaries म्हातारे होण्यापासून वाचवतील हे '३ मॅजिकल फूड्स'

पुढील लेख
Show comments