Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदरासोबत गिफ्ट्स देऊन करा महिलांचा सन्मान

Webdunia
गुरूवार, 7 मार्च 2019 (16:33 IST)
महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. जग भरातून जगभरातून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण, ८ मार्च या दिवशी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातही हा दिवस म्हणजे एखाद्या सणापेक्षा काही कमी नसतो. त्यामुळे याची तयारी आठवडाभर आधीच चालू असते. या दिवशी मुख्यत्वे महिला एकमेकांना शुभेच्छांसोबत गिफ्ट ही देत असतात. त्या निमित्ताने आम्ही तुमच्या साठी वेगवेगळ्या गिफ्ट्स आयड्या घेऊन आलो आहोत.
१. कॅरेटलेन बटरफ्लाय ईअररिंग्स
 
भारताच्या अग्रगण्य ओमनी-चॅनल ज्वेलर कॅरेटलेनने १० व्या वर्धापन दीना निमित्त 'बटरफ्लाय' मर्यादित आवृत्तीचे आधुनिक कलेक्शन आणले आहे. फुलपाखराप्रमाणे स्त्रीचे आयुष्यही मुक्त, स्वच्छंदी आणि अनेक रंगानी ढंगानी भरलेले असते. स्वप्नांचा पाठलाग करणे, ह्या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करणे आणि स्वतःहाची ओळख निर्माण करणे अश्या अनेक गोष्टीचा सामना आजची स्त्री करताना दिसते. याच प्रेरणेवर आधारित कॅरेटलेन बटरफ्लाय कलेक्शनची निर्मिती केली आहे. मुख्यत्वे बटरफ्लाय सोन्यामध्ये बनवून त्यामध्ये निळा, केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा दिल्या जातात. याची किंमत ही परवडणारी आहे, तसेच वजनाने हलके व नेहमी वापरण्याजोगे असल्याने आपल्या आई, बहिण, मैत्रिणीला किंवा ऑफिस कलिगला प्रेरणादायी कॅरेटलेन बटरफ्लायचे कलेक्शन देऊन तिचा योग्य सन्मान करू शकता. 

२. कॅरेटलेन गोल्ड लेस
 
ओमनी-चॅनल ज्वेलर कॅरेटलेन चे लोकप्रिय कलेक्शन 'गोल्ड लेस' तुमच्या प्रेयसीला देण्यास खूप उत्तम ठरू शकतात. यामध्ये मुख्य धातू सोन्यासह मोत्यांचाही वापर केला जातो. याच्या वर्तुळाकार कड्याना कलात्मक लेस दिल्या जातात त्यामुळे याला गोल्ड लेस म्हणतात. यातील प्रत्येक भाग कुशलतेने बनविला जातो, जेणेकरून त्याची चमक वाढेल. याचा उपयोग पार्टी, कॉलेज फेस्ट, ऑफिस मध्ये होऊ शकतो. 
३. कॅरेटलेन आरण्य पेंडंट
 
याची निर्मिती निसर्गावर प्रेरित आहे, झाडांची कोरलेल्या पानांवर आधारित याची रचना असून याच्या मध्य भागी हिऱ्यांचे कोंदण दिल आहे, त्यामुळे ते लक्ष वेधून घेते. यावर केलेली कलाकुसर कोणत्याही महिलेच्या पसंतीस उतरते. हे कॅरेटलेन चे आरण्य पेंडंट पत्नीला गिफ्ट्स दिल्यास उत्तम.
आपल्या परिवारातील किंवा फ्रेंड सर्कल मधील महिलांना खालील लिवाइको चे कपडे गिफ्ट करून त्यांचे वक्तिमत्व उठून दिसण्यास मदत करा.
लिवा प्लेड अँड चेक्स
 
चेक्स चे वेगवेगळे पॅटर्न उपलब्ध आहेत. स्कॉटिश प्लेड्स पासून ते गिंगहॅम, फ्लॅनेल मद्रास चेक्स सारखे प्रिंट अगदी उठून दिसतात. असे प्रिंट्स आधीपासून लोकप्रिय आहेत आणि कुठल्या ही सीजन मध्ये वापरू शकतो. पारंपरिक जुन्या पद्धतीचे बफेलो चेक्स किंवा सेल्टिक टार्टन पासून आजच्या चेक्सच्या प्रिंट मध्ये मिळतात. इनकॉर्पोरेटेड किंवा आवडणाऱ्या स्टाईल नुसार सुद्धा प्लेड्स परिधान केले जाऊ शकतात. त्याची डिझाईन डोळ्यांना सहज दिसेल असे घटक वापरून केलेली असते. ही एक प्रिंट आहे जी अनेक प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा इतर वेळीही काम करणाऱ्या महिलांसाठी लिवा प्लेड अँड चेक्स उत्तम गिफ्ट ठरू शकेल.
लिवा क्रीम पॉली जॅकर्ड टॉप / लिवा क्रीम सॅटिन प्लेटेड ट्राऊजर 
 
व्हिस्कोसपासून बनवलेल्या कपड्यांचे हे सॉफ्ट टेक्सचर आहे. ज्यामुळे त्यांना सहजपणे ड्रेप करणे सोपे होते आणि आपल्याला पाहिजे असलेल्या स्टाईल मध्ये वापरण्यास सोपे होते. फॅब्रिकची फ्लुएडीटी शरीरावर ड्रेप करण्यास अधिक मदत करते, त्यामुळे फॅब्रिक अंगावर चमकण्यास मदत होते. कपड्यांसह लेयरिंग अत्यंत सोपे आहे, कारण याचा पोत कपड्याचा गोळा होऊ देत नाही. क्रीम, उज्ज्वल रंग आणि पेस्टल्स रंग ट्रेन्डमध्ये आहेत, त्यामुळे फॅब्रिकची रंगीत होणारी क्षमता अधिक आकर्षक बनवते. लाकडाच्या लगद्यापासून  बनवलेल्या कपड्यांना एक वेगळेच तेज असते, जे शरीरावरच्या कपड्याना सुद्धा येते. लिवा चे हे सस्टेनेबल कपडे विशेषतः कोणत्याही पार्टी साठी सर्वोत्तम आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

निरोगी बाळाला जन्म द्यायचा असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

पुढील लेख
Show comments