suvichar

आई म्हणते...

Webdunia
रविवार, 6 मार्च 2016 (22:56 IST)
आई गर्भातल्या मुलीला म्हणते
नको येऊ या जगात 
कारण येथे कधीही 
स्त्रीजन्म पडतो महागात 
दुनिया खूप वाईट
स्त्रीवर कुठेही होतो बलात्कार 
आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,
सासू करते सूनेवर अत्याचार
मी पाहिले येथे 
स्त्री जात नाही स्वातंत्र्यात 
कधी बापाकडे, तर कधी
नवर्‍याकडे आहे पारतंत्र्यात 
तुझे वडीलही तुझ्यात 
जन्माच्या विरोधात राहतील
तु्झ्या हिस्याचे लाडही
तुझ्या भाववरच करतील
नको येऊ तू जगात... 
अधिकार मिळणार नाही घरात 
कारण येथे स्त्री-पुरुष 
समानता नाही समाजात 
येतो विचार मनात 
कुठपर्यंत हा त्रास सोसायचा
घराबाहेर जाताच स्त्रीजातीनेच 
पदराचा नकाब का ओढायचा? 
तू तर रणरागिणी, धैर्यवती 
घाबरून चालायचेच नाही
तुझ्या जन्माचे स्वागत
करायलाच पाहिजे.
-अरविंद पी. तायडे 
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

क्रीमने नाही तर मनुकाच्या पाण्याने चेहऱ्याची चमक वाढवा

रात्री ओवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

टॉक्सिक नात्याची ओळख करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Dog Food Guide कुत्र्यांचा आहार: काय द्यावे आणि काय टाळावे?

मातीशिवाय फक्त पाण्यात वाढणारी ५ इंडोर प्लांट्स; तुमच्या घराला देतील नवा लूक

Show comments