पुढील पानावर पाहा 'सलुजा फिरोडिय ा' ....
सलुजा फिरोडिया मोटवानी : कायनेटिक इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये जॉईंट एमडी पदावर असलेल्या सलुजा यांनी तरुण उद्योजिका म्हणून दमदार पाऊल टाकले आहे. कायनेटिकपासून होंडा वेगळी झाल्यावर कायनेटिक ब्रँडला नवे स्थान देण्यासाठी सलुजा यांनी उत्तम प्रयत्न केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
पुढील पानावर पहा 'रोशनी नादर'....
रोशनी नादर : टेक टायकून शिव नादर यांची ही कन्या तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मली असली तरी तिची स्वत:ची मेहनत काही कमी नाही. त्या एचसीएल कॉर्पोरेशनच्या एक्झिक्युटिव्ह डायेक्टर आणि सीईओ आहेत. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्यांनी सक्षमपणे बिझनेस सांभाळून दाखवला आहे.
पुढील पानावर पाहा 'पल्लवी आणि कृतिका गोपीनाथ'...
पल्लवी आणि कृतिका गोपीनाथ : कॅफ्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या कन्या पल्लवी आणि कृतिका यांनी 'हम भी कुछ कम नहीं' हे दाखवून दिले आहे. पल्लवी 'डेक्कन 360'मध्ये काम करते तर कृतिका 'डेक्कन चार्टर्स'मध्ये काम करते. त्यांच्या मातोश्री भार्गवी याही 'बन वर्ल्ड' नावाची बेकरी व्हेंचर्स चालवतात.
पुढील पानावर पाहा ' प्रीती अदान ी'....
प्रीती अदानी : अब्जावधींचा टर्नओव्हर असलेल्या अदानी ग्रुप फाँऊडेशनला चालवणार्या या प्रीती अदानी. त्यांचे पती गौतम अदानी यांनी हा ग्रुप सुरू केला होता. त्यांचा मुलगा करण पोर्ट बिझनेस सांभाळतो. अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी विल्मर, मुद्रा पोर्ट आणि सेज या त्यांच्या कंपन्या.