प्रांतवाद आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राजकारणात वर यायचे तर जो तो प्रांतवादावर भर देऊन वाद भडकवतो. प्रांतवर प्रेम हवेच. पण त्याचे राजकारण नको. नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील व ते आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील.
राजकारणी आज आपली पोळी भाजून घेतली. पण देशाचे ऐक्य मात्र धोक्यात येतील. आपल्या भाषेसाठी, अस्मितेसाठीचे हे आंदोलन म्हणजे राजकारणात पुढे येण्यासाठीची शिडी आहे. त्या शिडीचा वापर करून प्रत्येकाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत यायचे आहे. पण यामुळे समाजमनाला विद्वेषाच्या जखमा होतील त्याची जबाबदारी कोण घेणार? ( श्री. खडसे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)