अशी होती माझी आई - फार फार साधी, सरळ, प्रेमळ आरपार स्वच्छ नितळ -
सहजता तिच्या रोमारोमात होती. निष्पापता रंध्रारंध्रातून ठिबकत होती, सत्तरीतही ती बालक होती, बालकच पालक बनून आली होती -
दु:स्वास तिला माहीत नव्हता, आपपराच्या रेषा उमटल्याच नव्हत्या मायेची पाखर शरीरधारी झाली होती - पुण्याई आची आई होऊन आली होती -
आयुष्यात तापत्रयींची गर्दी होती ! सहजभाव शांतता छेदावी म्हणून प्रकृती अशांत होती. सौम्यता, सम्यकता दृष्यात बांधली होती ईश्वरी करणी आमच्या वाट्यास आली होती -
सावली बनून नि:संगाची, आई होऊन अष्टपुत्रांची, किती काय देऊन - ऋण सार्यांचे फेडून, करते बरसात केवळ कृपेची ! अशी आमची आई होती. फार फार साधी, सरळ, प्रेमळ, आरपार नितळ !