Dharma Sangrah

जीवन

- स्वाती दांडेकर

Webdunia
जीवन तुमचे घडविते बाळा
कोर्‍या कागदावरची कृति मनोरम रे
आपल्या अनुवांच्या रेषेनी
जीवन मधल्या वर्तुळानी
समाधानाच्या चौकोनात
घडवत आहे तुमचे जीवन बाळा।।1।।

जीवन असावे शिवराया सारखे
अणु रेणु मधुनी असावा जीवन आदर्शरे
मित्र असावा तानाजी जसा अन
रामदास स्वामी सारखे गुरू रे
प्रयत्न माझा सदैव राहील
बनु मी तुमची जीजा माता रे ।।2।।

जीवनात असावी कास प्रयत्नांची
महाराणा प्रतापची कथा आम्हा सांगते
प्रयत्नांन मधुन सदैव जाते
यशाची पाय वाट रे
यशस्वी जीवनाची प्रथम पायरी
असते सदैव अपयशाची
यशाच्या कळसाचा हा आभार स्तंभ
लपुन जातो जरी, तरी याचे
महत्व विसरू नका
ह्याचा आधार डावलु नका ।।3।।

माझ्या घरट्याची ऊब सदैव
राहील तुमच्या पाठीशी
मर्यादेचे माझ्या घरास कुंपण
कर्तव्याच्या भिंती रे
आदर्श असे प्रवेश द्वार माझे
आदराचे घरात वारे
मायेचे छत असो डोक्या वरती
प्रेमाची राहे सदा बरसात रे ।।4।।

कर्तव्याची न साथ सोडावी
प्रेमाची न कमतरता असावी
शालीनता न कधी दूर करावी
निर्मल जल समान जीवन जगावे
हीच माझी तुम्हा शिकवण रे ।।5।।

एकच मागते तुमच्या जवळी
ठेवा लाज माझ्या दुधाची
माझ्या मागे माझ्या मागे ।।6।।
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

वजन कंट्रोल करतात या फायबरयुक्त भाज्या नियमित सेवन करा

Career After 12th : बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

चेहऱ्याची सैल त्वचा कशी घट्ट करावी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

झोपण्यापूर्वी लहान वेलची चघळल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात हे बदल दिसून येतील

पुढील लेख
Show comments