श्रीमद्भगवद् गीतेमधला हा १८ वा अध्यायातला ७३ वा श्लोक बरंच काही सांगून जातो... अर्थात, श्रीकृष्णान े अर्जुनाला कौरवांश ी युध्द करण्यासाठी उपदेश केल्यानंतर शेवटी अर्जुन म्हणाला की, हे देवा, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आणि मी स्मृती प्राप्त केली आहे. आता मी संशयरहित होऊन स्थित आहे, आणि मी आपल्या आज्ञेचे पालन करेन.
शासनाने आता तरी डोळ्यावरची झापडं दूर करून अक्षरशः 'अॅक्शन' घेण्याची नाही, तर...करण्याची गरज आहे. उपरोक्त श्लोकाचा सारांश लक्षात घ्यावा, जवळपास सगळी राजकारणी मंडळी मोहासाठी (सत्तेसाठी) अशा मोठ्या दुःखद घटनांचे भांडवल देखील करण्यास मागेपुढे पहात नाहीत, हे गेल्या दोन दिवसांच्या घटनेने सिध्द होते आहे. आमच्या डोळ्यांवर झापडं नाहीत, आम्हीही स्वस्थ बसलो नाही, केवळ भाषणबाजी करीत नाही, हे घ्या...आम्ही केलेली ही कृती पाहा...अशी भूमिका सरकारने घेण्याची जनता वाट पहात आहे. या घटनेशी आपला संबंध नसल्याची टिमकी पाकिस्तान नेहेमीप्रमाणेच वाजवते आहे. मात्र तिथूनच वारंवार फोन येत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सुरक्षा यंत्रणा सांगते आहे.
पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत अनेक मातब्बरांनी मुंबईला भेट दिली, पैशापारी पैसा खर्च झाला, याचा उपयोग काहीच होणार नाही. याऐवजी घटनेत मृत झालेल्या आणि कर्तव्यावर असताना प्राण गमवावे लागलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचार्यांना तेवढी भरपाई दिली असती. सुरक्षा यंत्रणांनी आधी 'संभाव्य हल्ल्याबाबत माहिती' दिल्याचे गृहमंत्रालयाने मान्य करून काय दाखवले? केवळ भाषण ठोकून द्स्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी जनतेचे सांत्वन केले.
PTI
PTI
देशाच्या दोन्ही राजधान्यांमध्ये इतक्या गंभीर घटना घडल्या तरीही अजून भाषणबाजी होते आहे, हे योग्य नाही. ज्या देशातून अतिरेकी आले त्या देशासह अतिरेक्यांच्या संघटनांना सुध्दा 'वॉर्निंग' देणे आवश्यक आहे.राजकारण्यांनी आता आपण राजकारणी आहोत, हा विषय बाजूला ठेवून आपण देशाचे नागरिक आहोत, जनतेचे प्रतिनिधी आहोत, त्यांचा देशरूपी निधी सुरक्षित ठेवणे हे प्रथम कर्तव्य समजून कारवाई आणि कार्यवाही करावी. तरच देशाचे भावी युवकांपुढे आदर्श उभा राहिल...