Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई की युध्‍दभूमी...

संदीप पारोळेकर
NDND
देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबईला सुमारे 45 तासाहून अधिक काळ दहशतवाद्यांनी वेठीस धरले. देशाच्‍या आर्थिक राजधानीत दहशतवाद्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला केला आणि भारतीय गुप्‍तचर व्‍यवस्‍थेचे पितळ उघडे पाडले. बुधवारची काळरात्र दोन दिवसांनंतरही संपलेली नाही. पहाट कधी होणार याकडेच सार्‍या देशवासियांचे लक्ष लागून आहे. तब्बल दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यात 200 पेक्षाही अधिक निरपराध व्यक्तीना जीव गमवावा लागला आहे. तर दोन लष्करी अधिकार्‍यासह 14 पोलीस कर्मचार्‍यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.

सतत धावणार्‍या मुंबईला दहशतवाद्यांनी गेल्या तीन ‍दिवसांपासून एके- 47 रोखून वेठीला धरले आहे. मुंबईत सागरी मार्गाने शिरलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी देशाच्या जवानांनी जीवाची बाजी लावली आहे. आग ओकणार्‍या बंदुकांनी प्रचंड संघर्ष सुरू आहे. जणू मुंबईत दहशतवादी रक्तरंजित दिवाळीच साजरी करायच्या उद्देशाने अतिरेकी शिरले आहेत, अशी भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे.
  उष:काल होता होता काळ रात्र झाली... अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली... मुंबईत सुरू असलेले तांडव पाहून कवी सुरेश भटांच्या या कवितेचे स्मरण होते. आज खरंच दहशवाद्यांविरूध्द कंबर कसण्याची वेळ आली आहे. मशाली पेटवून स्वत: पेटून उठण्याची वेळ आली आहे.      


सतत घोंगावणार्‍या एम्‍ब्‍युलन्‍स... जखमींच्‍या किंकाळ्या आणि मृतांच्‍या नातेवाईकांचा टाहो... मुंबईतच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यात गुंजत आहेत. नेहमी मनाला सुखद वाटणारा सागर आणि देशी विदेशी पर्यटकांचे हसतमुख चेहर्‍याने स्वागत करणारे 'गेट वे ऑफ इंडिया' देखील दहशतवादी षडयंत्र पाहून स्तब्ध झाले आहे. देशाच्‍या सौंदर्याला चार चांद लावणा-या पंचतारांकीत 'हॉटेल ताज'चे अंतर्गत रूपही किती सुंदर असेल, याचे सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असते. मात्र, आज 'ताज' युध्‍दभूमी झाल्‍याचे दिसत आहे. दहशतवाद्यांनी ताजचे सौंदर्य ओरबाडून काढले आहे. तब्बल तीन दिवस मुंबईत युध्दाचा प्रसंग सारे जग पाहत आहे. आता 'करा वा मरा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दहशतवाद्यानी अतिशय नियोजनपूर्वक हे काळे कृत्य केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके, एके- ४७ सारखी घातक शस्त्रे आणून ती मुंबईच्या हद्दीत पेरणे हा काही एक दोन दिवसाचा खेळ नाही. नरीमन हाऊसमध्ये तर ते दोन महिन्यांपासून रहात होते, असे कळते. असे असेल तर दहशतवाद्यांनी पेरून ठेवल्याला या लहान रोपट्यांना पाणी घालून मोठे करण्याचे काम करणारे आपल्यातच लपलेले आहेत. दहशवादी आले कुठून? या प्रश्नावर चर्चा करण्याबरोबरच त्यांना येथे आसरा देणारे, पोसणारे यांचाही विचार केला पाहिजे. राजकारण्यांनी याचे भांडव न करता मुंबईसह देशाच्या सुरक्षेबाबत विचार करून हे संकट नाहिसे करण्यात हातभार लावला पाहिजे.

NDND
उष:काल होता होता काळ रात्र झाली...
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
मुंबईत सुरू असलेले तांडव पाहून कवी सुरेश भटांच्या या कवितेचे स्मरण होते. आज खरंच दहशवाद्यांविरूध्द कंबर कसण्याची वेळ आली आहे. मशाली पेटवून स्वत: पेटून उठण्याची वेळ आली आहे. भारताचे जॉंबाज सैनिक तब्बल 40 तासांपासून अहोरात्र दहशतवाद्यांशी संघर्ष करत आहेत. हे आता कुठे तरी थांबले पाहिजे. राजकारण्यांनी वातानुकूलीत चार भिंतीच्या बाहेर येऊन तेच ते 'रेडिमेड स्टेटमेंट' न देता देशातूनच दहशतवाद संपविण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत.

' गेट वे ऑफ इंडिया' परिसरात आज जी स्मशानशांतता पसरली आहे. हा परिसर पूर्वीसारखा फुलून जाण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? हाच सध्या प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे.

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments