Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुलेटच्या चाकात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (21:40 IST)
पती-पत्नी देवदर्शनाहून घरी निघाले असताना चाकात ओढणी अडकून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्नीच्या निधनामुळे पतीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून पती-पत्नी आपल्या मनातली इच्छा घेऊन तुंगारेश्वर येथील महादेवाच्या दर्शनासाठी गेलेे होते.  देवदर्शन झाल्यावर दोघेही पून्हा घराच्या दिशेने निघाले होते.
 
पती आणि पत्नी दोघेही बुलेटवरुन घरी जात होते. यावेळी पत्नीची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने पत्नीला गळफास बसला आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पत्नीच्या डोक्याला जोरात मार लागल्यानेे तिचा जागीच मृत्यू झाला.
 
प्रतिमा यादव (वय 27, रा. इराणवाडी, कांदिवली पश्चिम) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. पत्नीचा जीव वाचावा म्हणून पतीने तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अपघातात पत्नीने पती समोरच जीव सोडला.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments