Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अविवाहित महिलेला गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी न्यायालयाकडून मिळाली परवानगी

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (10:35 IST)
मुंबई उच्च न्यायालयाने 23 वर्षाच्या एका अविवाहित महिलेला ही परवानगी दिली आहे की, ती 20 आठवड्यांपेक्षा अधिक असलेली गर्भधारण काढू करू शकते.
 
कोर्ट काय म्हणाले?-
अशा संकुचित अर्थाने अविवाहित महिलांविरुद्ध कायदेशीर तरतूद भेदभाव करणारी ठरेल आणि त्यामुळे घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन होईल, असे खंडपीठाने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने नायालयाकडून तिला नको असलेली गर्भधारणा पडण्याची अनुमती मागितली होती. या महिलेचे म्हणणे होते की, खासगी कारण आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ती या मुलाला जन्म देऊ शकत नाही. याकरिता तिला ही गर्भधारणा नको आहे.
 
तसेच न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने 7 ऑक्टोबर रोजी अविवाहित महिलेच्या याचिकेला महाराष्ट्र सरकारच्या विरोधाचा अपवाद म्हणून याचिकाकर्ता 20 आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या महिलांच्या निर्दिष्ट श्रेणीमध्ये येत नाही.
 
काय आहे नियम?
'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा' नियमावलीचे नियम 3-बी च्या अंतर्गत केवळ काही श्रेणींच्या महिलांना 24 आठवड्यांची गर्भधारणा पाडण्याची परवानगी आहे. ज्यामध्ये लैंगिक शोषण पीडित, अल्पवयीन, विधवा किंवा घटस्फोटित, शारीरिक किंवा मानसिकरीत्या अपंग महिला सहभागी आहे. 
 
महिला आपल्या याचिकेत काय म्हणाली आहे?  
महिला तिच्या याचिकेत म्हणाली होती की, तिने संमतीने शारीरिक संबंध ठेवले होते, त्यामुळे ती गर्भवती झाली. पण मुलाच्या संगोपनासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. सप्टेंबर 2024 मध्ये, महिला 21 आठवड्यांची गरोदर होती आणि सरकारी जेजे रुग्णालयाने तिला गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याचा सल्ला दिला होता.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारताने बांगलादेशचा 3ऱ्या T20 मध्ये 133 धावांनी पराभव केला

ब्राझीलमध्ये विनाशकारी वादळामुळे लाखो लोक बेघर, 7 जणांचा मृत्यू

Baba Siddique: फटाक्यांच्या आवाजाचा फायदा हल्लेखोरांनी घेत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या

खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवासी वाहनावर अज्ञात बंदूकधाऱ्यांचा गोळीबार

IND vs BAN: संजू सॅमसनने भारतासाठी T20 मधील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले

पुढील लेख
Show comments