Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह ग्रामीण भागातील महिलांसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करणार

Webdunia
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (16:00 IST)
नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता बोलत होते.
 
महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे. विशेषतः गरोदर महिलांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी ही सुविधा असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टींग, लॅब, ८१ प्रकारची औषधे, ४० प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी व महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकते.
 
ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्ह्याला दोन-दोन फिरते दवाखाने असणार आहे. ग्रामीण भागासह मुंबईमध्येही फिरत्या दवाखान्यांच्या संख्येत अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल असेही टोपे म्हणाले. या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या किंवा रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल अशीही माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Gwalior-Agra Expressway ने 3 राज्ये जोडली जातील, प्रवासाचा वेळ कमी होईल, पहा संपूर्ण मार्ग

Mahayuti Leaders Controversy मंत्री न केल्याने महायुतीचे नेते नाराज, तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तणाव वाढला

LIVE: अजित पवार आजही विधानभवनात आले नाहीत

विकास ठाकरे घेणार महाराष्ट्र काँग्रेसची धुरा ! नाना पटोले यांच्याविरोधात बंडखोर आवाज उठवण्यात आला

काय खरंच 45 दिवस मोफत राहतील हे 7 टोल बूथ? व्हायरल झालेल्या बातमीची NHAI ने सत्यता सांगितली

पुढील लेख
Show comments