Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अविनाश भोसले 30 मे पर्यंत नजर कैदेत; CBI कोर्टाचा निर्णय

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (21:35 IST)
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने DHFL घोटाळा प्रकरणात अटक केली आहे.
 
मुंबई | केदार शिंत्रे : राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांच्या (Central Agencies)कारवायांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. राजकीय मंडळींसोबतच पुण्यातील बड्या उद्योगपतीवर सीबीआयनं कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune) प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर 30 मे पर्यंत त्यांच्या वरळीच्या घरी त्यांना नजरकैदेत ठेवावं असे आदेश न्यायालयाने दिले आहे. CBI कोर्टाचे न्यायाधीश शिंगाडे यांनी हा निर्णय दिला. 
 
अविनाश भोसले यांच्या कोठडीवर कोर्टाच्या वेळेअभावी आज निर्णय होऊ शकला नाही. या दरम्यान वकील आणि परिवारातील एक सदस्यच भोसले यांना भेटू शकणार आहे. 30 मेपर्यंत CBI अविनाश भोसले यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, या दरम्यान CBI आपलं उत्तर दाखल करणार आहे. CBI गेस्ट हाऊसमध्ये अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवणार आहेत. सीबीआयकडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र भोसलेवर करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकीलांनी रिमांडला विरोध केला. भोसलेंना वरळी येथील घरी किंवा सेंट रेजिस पंचताराकिंत हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवत त्यांना सर्व जेवण, मेडिकल सुविधा देण्याची तयारी दर्शवली. तसेच 28 आणि 29 मे रोजी एक तास 5 ते 6 या वेळेत त्यांचे वकिल विजय अग्रवाल व धवल मेहता यांना भेटण्याची परवानगी दिली आहे.
 
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments