कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यांपासून मुंबईतील उपगरीय सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र आता राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने मुंबईतील उपनगरीय सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेने लोकल सेवेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोकल शुक्रवारी २९ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. शुक्रवार पासून १३६७ सेवा सुरू करण्यात येणार आहेत. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी लवकरच दिली जाईल, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते.