Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BMC Budget 2022 महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय-काय मिळालं? जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (14:03 IST)
मुंबई- आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भरघोस वाढ झाल्याचं पहायला मिळत असून एकूण 45 हजार 949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
 
या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज 2021-22 या वर्षाच्या अंदाजापेक्षा 39038 कोटी म्हणजेच 17.70 टक्क्यांनी अधिक आहे. 
 
महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय-काय मिळालं-
मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटींती तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्यापाण्यातून 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे.
 
बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा तलावावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविग्युत प्रकल्प, 80 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरउर्जा प्रकल्प यासाठी 10.30 कोटींची तरतूद तर जलवहन बोगद्यांसाठी- 467 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 
मुंबई मनपा तेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक मोटार वाहनांच्या वापराला पाठिंबा देत आहे. खाजगी आणि शासकीय उपक्रमांना मनपाच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन (PEVCS) स्थापित करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय
 
टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत, मुंबई मनपाच्या शाळांच्या आवारात तसेच सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध प्रकल्प राबवण्याचे प्रस्तावित आहे. 
 
शाळेचे आवार आणि शाळेच्या आजुबाजूच्या परिसरातील उपयोगात नसलेल्या जागेचा सुयोग्य वापर करण्यासाठी योजना आखणे. आराखड्याचा अभ्यास आणि खेळ या घटकांचा समावेश करणे.
 
रस्ते आणि वाहतूक खात्याने, विभाग कार्यालये आणि वाहतूक पोलीस यांच्या सहयोगाने 'सुरक्षित शाळा' ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर तयार केली. 
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेत आता नागरिक भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे मालमत्ता कर बिल आणि पाणी कर बिल भरू शकतात.
 
कचरा निर्मीती करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावा लागणार आहे. वर्षाला वापरकर्ता शुल्कातून 174 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य आहे. 
 
बेस्ट उपक्रमासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद
 
मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) - 2072 कोटींची तरतुद
 
सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी सुधारित अंदाजात 3500 कोटी रु ची तरतूद
 
मुंबईतील 47 पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या च्या कामासाठी-- 1576.66 कोटींची तरतुद
 
मुंबईतील नवे रस्ते तसंच, रस्ते सुधारणांकरता -2200 कोटींची तरतुद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईतील डोंगरीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

LIVE: महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला मोठा विजय दिला- एकनाथ शिंदे

भाजप जो काही निर्णय घेईल शिवसेना त्याला पाठिंबा देईल-एकनाथ शिंदे

पालघरमध्ये आरोग्य सुविधांच्या अभावामुळे, प्रसूती वेदनांनी त्रस्त महिलेचा रुग्णवाहिकेत मृत्यू

एकनाथ शिंदे यांनी बोलावली पत्रकार परिषद, कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री?

पुढील लेख
Show comments