Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चुकीच्या डोस मुळे 2 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:28 IST)
वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्याच्या निंबी गावात आरोग्यविभागाच्या हलगर्जीपणा मुळे एका दोन महिन्याच्या  चिमुकलीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.असा आरोप मयत मुलीच्या पालकांनी केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कासोळा आरोग्यकेंद्रामार्फत निबी गावात मुलांचे पोलिओ डोस लसीकरण सुरु होते. त्यात या चिमुकलीला दिलेल्या पोलिओ डोस मुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आणि तक्रार मुलीचे पालक केशव आडे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, या मुलीला 8 फेब्रुवारी 2022रोजी  पोलिओचा डोस दिला त्यानंतर मुलीच्या मेंदूने काम करणे बंद केले. तिला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता तिथल्या डॉक्टरांनी तिला अकोल्याला नेण्याचा सल्ला दिला त्या मुलीचा डोक्यात ताप शिरल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या बाबत आरोग्यविभागाने स्पष्टीकरण दिले आहे की , आम्ही शासनाने दिलेल्या आदेशानुसार लसीकरण करत आहोत.लसीकरण केल्याच्या 24 तासात त्याचे परिणाम जाणवतात. असे काहीच झाले नाही. पण त्या मुलीची प्रकृतीत दुसऱ्या दिवशी बिघाड झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिओ डोस दिल्याने असे काही झालेलं नाही. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments