Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो सेवेचे लोकार्पण, अशी धावणार मेट्रो

Webdunia
शनिवार, 2 एप्रिल 2022 (21:57 IST)
मुंबईतील पश्चिम उपनगरासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रवास करत मुंबईतकांच्या सेवेत ही मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मेट्रो ७ मार्गावर आरे ते कुरार असा प्रवास केला.  मेट्रोच्या २ ए आणि मेट्रो ७ या मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
मुंबईकरांसाठी पश्चिम उपनगरात या मेट्रोच्या २ अ आणि मेट्रो मार्ग ७ च्या फेऱ्यांमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा अंदाज एमएमआरडीएने बांधला आहे. तसेच रस्त्यांवरील वाहनांची संख्याही या मार्गांमुळे कमी होण्यासाठी मदत होईल, असा अंदाजही एमएमआरडीएने वर्तवला आहे. मेट्रोच्या २०.७३ किमीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत खुला करून देण्यात येत आहे. एकुण ११ ट्रेन या मार्गावर चालवण्यात येणार असून त्या माध्यमातून एकुण १५० फेऱ्या या मार्गावर होतील.
 
कसे आहे वेळापत्रक ?
मेट्रोकडून एकुण ११ ट्रेन्स या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनला ६ कोचेस आहेत. तर ११ ट्रेन्सची एकुण कोचेसची संख्या ६६ इतकी आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. साधारण ११ मिनिटांनी एक ट्रेन अशा मेट्रोच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या ट्रेनची प्रवासी क्षमता ही २२८० प्रवासी प्रति ट्रेन इतकी आहे. तर प्रत्येक कोचनिहाय ५० जणांची क्षमता असणार आहे. ताशी ७० किमी वेगाने या ऑपरेट करण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी मिळाली आहे. तर यापुढच्या काळात ताशी ८० किमी वेगाने ट्रेन ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळू शकते अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली आहे. आगामी काळात मेट्रोच्या ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
 
मेट्रो मार्गिकांची वैशिष्ट्ये ?
– ड्रायव्हरलेस ऑपरेशनसाठी ट्रेन डिझाईन करण्यात आल्या आहेत
– सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
– दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रो स्थानकांवर सुविधा
– प्रथमोपचाराची रेल्वे स्टेशनवर सुविधा
– महिलांसाठी विशेष कोच
 
मेट्रो २ अ स्थानके
१ दहिसर पूर्व
२ आनंद नगर
३ कांदरपाडा
४ मंडपेश्वर कॉलनी
५ एकसर
६ बोरिवली पश्चिम
७ पहाडीएकसर
८ कांदिवली (पश्चिम)
९ डहाणूकर वाडी
 
मेट्रो ७
१ आरे
२ दिंडोशी
३ कुरार
४ आकुर्ली
५ पोयसर
६ मागाठाणे
७ देवीपाडा
८ राष्ट्रीयउद्यान
९ ओवरी पाडा
१० दहिसर (पूर्व)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

PKL 2024: तमिळ थलायवासने यूपी योद्धास 14 गुणांनी पराभूत केले

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्धविराम

LIVE: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

महाराष्ट्रात भाजप अडचणीत, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती का?

पुढील लेख
Show comments