Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुर्ला बस अपघातावर शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत केली जाहीर

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (11:51 IST)
Mumbai News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ला दुर्घटनेतील मृतांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च बेस्ट आणि बीएमसी उचलणार आहे. मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बस अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 49 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुर्ला दुर्घटनेतील मृतांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च बेस्ट आणि बीएमसी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात काही जणांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.' जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो असे देखील ते म्हणाले.
 
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टला उचलण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांचा मोठा दावा, लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही सहभाग नाही अनमोल चालवतो वेगळी टोळी

जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्राची क्षमता तपासण्याची गरज-देवेंद्र फडणवीस

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांचे निधन

LIVE: मंगळवार 10 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचे नागपुरात निदर्शने

पुढील लेख
Show comments