Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

Webdunia
रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (20:16 IST)
मुंबई - जागतिक महामारी कोरोनाचा संपूर्ण जगाला फटका बसला आहे. यातच हातावर पोट असणारे मुंबईच्या डबेवाल्यांवरही कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर डबेवाल्यांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सायकल एचएसबीसी बँकेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
 
पहिल्या टप्प्यात अंधेरी- जोगेश्वरी भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. हा कार्यक्रम आज रविवारी जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या एच के इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी सेंटरच्या पटांगणात पार पडला. पुढील आठवडाभरात संपूर्ण मुंबईतील डबेवाल्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या जातील.
 
कोरोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मुंबईच्या डबेवाल्यावर उपासमारीची वेळ आली होती. असंघटित कामगार असणाऱ्या या डबेवाल्यांना विविध एनजीओ आणि कंपन्यांच्या माध्यमातून रेशन किटचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एचएसबीसी बँकेने मुंबई डबेवाल्यांसाठी सीएसआर फंडातून पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. यातूनच मुंबई डबेवाल्यांना रेशन, डबेवाल्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी टॅब वाटप आणि नव्या सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय मुंबई डबेवाल्यांना मोबाईलदेखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
 
विविध एनजीओ आणि कंपन्यांची मदत मुंबईतील काम करणाऱ्या चाकरमान्यांना वेळेवर त्यांचा डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईच्या डबेवाल्यांवर कोरोनामुळे संकट आले होते. गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर अनेक डबेवाले आपापल्या गावी परतले असून तिथेच काम करत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना मुंबईतील कार्यालय सुरु झाले असले तरी बऱ्याच कार्यालयातील कर्मचारी घरून काम करत आहेत. यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय मंदावला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध एनजीओ आणि कंपन्यांच्या माध्यमातून मदत कार्य करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments