Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली

Webdunia
गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:01 IST)
मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आणि  धरणातील सध्याची पाणीपातळी पाहता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट अटळ असण्याची चिन्हे आहेत.
 
राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी विनंती करणार आहोत. मात्र, ती मान्य न झाल्यास आम्हाला काही काळासाठी पाणीकपात करावी लागल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे ७ जूनपासून बरसणारा पाऊस आता लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलै २०२३ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती.
 
२०२२ मध्येही १० टक्के पाणीकपात केली होती. मार्च, एप्रिल व मे महिना उन्हाळी असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनावर संपूर्ण महाराष्ट्राने शोक केला व्यक्त

शरद पवार-अजित पवार एक होणार, 8 आणि 9 जानेवारीला बोलावली महत्त्वाची बैठक

मनमोहन सिंग यांच्या निधनाने महाराष्ट्राने शोक व्यक्त केला, मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Year Ender 2024: भारतातील सुंदर ठिकाणे जी सेलिब्रिटींची पहिली पसंती ठरली

LIVE: शरद पवार पक्षात काही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात

पुढील लेख
Show comments