Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत रेल्वे रुळावर पिता-पुत्राच्या आत्महत्येचा Video कॅमेर्‍यात कैद

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2024 (12:10 IST)
मुंबई रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिवसाढवळ्या दोन जणांनी मृत्यूला कवटाळले. या दोघांची ओळख पिता-पुत्र अशी झाली आहे. दोघेही एकत्र रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि ट्रेन येताना पाहून रुळावर आडवे झाले. भरधाव वेगात असलेली ट्रेन दोघांच्याही अंगावरुन गेली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
 
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. वसई पूर्वेला असलेल्या या रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी दोघे पिता-पुत्र आत्महत्या करताना दिसले. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वडिलांचे वय 60 वर्षे तर मुलाचे वय 30 वर्षांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोघेही बोलत असताना स्टेशनवर फिरत आहेत. मग दोघेही स्टेशनवरून खाली येतात आणि रुळ ओलांडू लागतात. दरम्यान दुसऱ्या ट्रॅकवर ट्रेन येत असल्याचे पाहून दोघेही रुळावर आडवे झाले. मग ट्रेन त्यांच्यावर चढून पुढे जाते.
 
वडिलांच्या खिशात सुसाईड नोट सापडली
मात्र दोन्ही पिता-पुत्रांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची वसई जीआरपीने आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. वडिलांच्या खिशात सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात लिहिलं आहे की, आम्ही आमच्या मर्जीने ही पावलं उचलत आहोत आणि आमच्या मृत्यूसाठी आम्ही कोणाला दोष देत नाही.
 
चालकाने ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला
भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर सोमवारी सकाळी 9 वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन जवळ येताच दोघेही रुळावर पडले. त्याला खाली पडलेले पाहून चालकाने ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. भरधाव वेगामुळे गाडी दोघांच्या अंगावर जाऊन पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, 60 वर्षीय व्यक्तीने कोरोना महामारीच्या काळात पत्नी गमावली होती. त्यांच्या मुलाने सहा महिन्यांपूर्वी प्रेयसीशी लग्न केले. सासरे आणि पतीच्या मृत्यूने महिलेलाही धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैधता चाचणीसाठी पहिले व्यावसायिक उड्डाण यशस्वीरित्या उतरले

LIVE: अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे केली तक्रार

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे केली तक्रार

मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन सुनावणीसाठी नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियम जारी केले

धारावी प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीचे नाव अचानक बदलले

पुढील लेख
Show comments