Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘स्वराज्य महोत्सवा’साठी ३५ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी

Webdunia
गुरूवार, 7 जुलै 2022 (07:57 IST)
मुंबई : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून दि. 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
 
दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” साजरा होणार आहे. याअंतर्गत तालुका व ग्रामस्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी राज्यातील 358 तालुके व 351 पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
 
दि. 12 मार्च, 2021 पासून देशभरात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हा उपक्रम सुरु झाला असून या अंतर्गत ऑगस्ट, 2023 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments