Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका कमालीचा वाढला

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (21:36 IST)
मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका कमालीचा वाढलाय. मुंबईत कमाल तापमान ३८ अशांवर पोहोचलं आहे. किमान तापमानही २३ अंशांवर आहे. कमाल तापमानात वाढ कायम राहणार आहे.डहाणूमध्येही 38 अंशांवर पारा गेला आहे. कमाल तापमानात सरासरी 7 अंशांची वाढ झाली. समुद्र किनारी भागात कमाल तापमान 37 अंशांच्या पार जाणं हा उष्णतेच्या लाटेचा पहिला निकष आहे. 14 आणि 15 मार्चला मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
 
14 मार्च दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा तर 15 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. काळजी घ्या, IMD ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
 
मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39 डिग्री राहिल व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता. कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37 डिग्री सेल्सियस असावे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments