Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात 1400 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त, रेव्ह पार्ट्यांमध्ये हे अवैध ड्रग वापरले जाते

Webdunia
गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (15:00 IST)
मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकून 1,400 कोटी रुपयांचे 700 किलो पेक्षा जास्त 'मेफेड्रोन' जप्त केले असून या संदर्भात 5 जणांना अटक केली आहे. मेफेड्रोनला म्याऊ म्याऊ किंवा एमडी असेही म्हणतात. रेव्ह आणि पूल पार्ट्यांमध्ये हे बेकायदेशीर औषध सर्रास वापरले जाते.
 
मुंबई क्राइम ब्रँचच्या अमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) या युनिटवर छापा टाकला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एएनसीच्या पथकाने या परिसरात छापा टाकला आणि त्यादरम्यान तेथे बंदी घातलेले औषध 'मेफेड्रोन' तयार होत असल्याचे समोर आले.
 
 
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर नालासोपारा येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी अलीकडच्या काळात पकडलेली ही सर्वात मोठी अंमली पदार्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments