मुंबई-बोरोवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. बोरिवलीत साईबाबा नगरच्या गीतांजली इमारतीत ही दुर्घटना घडली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे. घटनेची माहित मिळतातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु आहे. गीतांजली ही तळ मजला आणि वर तीन मजली इमारत असून दुपारी 12:34 वाजेच्या सुमारास कोसळली.
<
Maharashtra | A four-storey building collapsed in Saibaba Nagar of Borivali West in Mumbai. Details awaited: Fire Brigade
— ANI (@ANI) August 19, 2022
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.