Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या प्रकारे वाढतोय मुंबईचा धोका

Webdunia
शुक्रवार, 29 मे 2020 (10:56 IST)
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत असून येथील कोरोना रुग्णांची संख्या 35,485 हजारावर पोहोचली.
 
गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे 1438 नवीन रुग्ण सापडते. त्यामुळं महानगरातील संक्रमणाचा आकडा 35 हजार पार झाला. महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 9817 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 763 रुग्ण निरोगी झाले आहेत.
 
पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील 99% अतिदक्षता विभागातील बेड आणि 72% व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. जी रुग्णालयं कोव्हिड-19च्या गंभीर रुग्णांवर उपचार करत आहेत ती देखील 96 टक्के भरले आहेत.
 
मुंबईतील वॉर्डचाविचार करता सर्वाधिक कोरोना रुग्ण जी-उत्तर वॉर्ड म्हणजे धारावीचा परिसर मध्ये आहेत. मुंबईतील वॉर्डनिहाय कोरोनाव्हायरस रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे
 
2 हजारपेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड
जी उत्तर वॉर्ड - धारावी, माहीम, दादर : 2728
ई वॉर्ड - भायखळा, नागपाडा, माझगाव : 2438
एफ उत्तर वॉर्ड - माटुंगा किंग सर्कल :  2377
एल वॉर्ड - कुर्ला : 2321
एच पूर्व वॉर्ड - बांद्रा, सांताक्रुझ पूर्व : 2094
के पश्चिम वॉर्ड - अंधेरी पश्चिम : 2049
 
माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल 2,728 कोरोना रुग्ण आहेत.  धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे.
 
2 हजारपेक्षा कमी रुग्ण असलेले वॉर्ड
जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन : 1905
के पूर्व - अंधेरी पूर्व : 1875
एम पूर्व - गोवंडी, मानखुर्द : 1696
एफ दक्षिण - परेल दादर पूर्व : 1648
एन वॉर्ड - घाटकोपर : 1525
एस वॉर्ड - विक्रोळी, भांडुप नाहूर : 1278
आर उत्तर - दहिसर -309
 
दहिसरमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने संपूर्ण परिसरात टाळेबंदी कठोर करण्याचा विचार असून घराबाहेर पडणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
 
झोपडपट्टय़ांमध्ये करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील लोकसंख्या अधिक असल्यामुळे सार्वजनिक शौचालय वापणार्‍यांची संख्या अधिक आहे त्यामुळे झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये दररोज चार ते पाच वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. येथील अरुंद वाटाही तीन-चार दिवसातून एकदा निर्जंतूक करण्यात येतील.
 
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या 1,529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 
 
BMC ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभाग देखील कोरोनामुळे प्रभावित झाला असून फायर ब्रिगेडमध्ये जवळपास 35 कर्मचारी कोरोना 
 
पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर सुरक्षा विभागात 80 हून कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे असून एकाचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मनू भाकरला खेलरत्न मिळू शकतो,अंतिम यादी निश्चित झालेली नाही- क्रीडा मंत्रालय

IND vs AUS: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही, पुढील दोन कसोटींसाठी अनफिट घोषित

दाऊद इब्राहिमच्या भावावर मोठी कारवाई, ईडीने मुंबईतील फ्लॅट ताब्यात घेतला

जयपूर टँकर अपघातात जखमी दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या 15 वर पोहोचली

LIVE: एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना भाजपने फसवले! शिवसेना संतप्त

पुढील लेख