Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिली मासिक पाळी आल्यानंतर तणावाखाली मुंबईच्या 14 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली

Webdunia
गुरूवार, 28 मार्च 2024 (13:06 IST)
मुंबईच्या मालवणी भागात 14 वर्षांच्या मुलीच्या कथित आत्महत्येने लोकांना धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली आणि तिला खूप वेदना होत होत्या. यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मयत मुलगी तिच्या मासिक पाळीच्या कमी आणि चुकीच्या माहितीमुळे तणावाखाली होती.
 
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टप्रमाणे, पोलिसांनी सांगितले की मुलीने 26 मार्चच्या संध्याकाळी आत्महत्या केली. त्यावेळी घरी कोणी नव्हते. मुलीचे शेजारी आणि नातेवाईक तिला घेऊन कांदिवली येथील शासकीय रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मृलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिला पहिल्यांदा मासिक पाळी आल्याने तिला त्रास झाला होता. तीव्र वेदनांमुळे ती मानसिक तणावाखालीही होती. 
सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस मृत मुलीच्या फ्रेंड्सशी बोलून त्याच्या मानसिक तणावाबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय मुलीच्या ऑनलाइन अॅक्टिव्हीटीबद्दल माहिती संकलित केली जाणार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.
 
आणखी अनेक प्रकरणे
पहिल्या पाळीमुळे आत्महत्येची ही पहिलीच घटना नाही. 16 मे 2019 रोजी दिल्लीतील बुरारी परिसरात 12 वर्षांच्या मुलीने याच कारणावरून आत्महत्या केली होती. तिच्या मोठ्या बहिणीने सांगितले होते की, तिला पहिल्या मासिक पाळीच्या वेदनामुळे त्रास झाला होता.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments