Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mumbai: धावत्या टॅक्सीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींना अटक

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (14:47 IST)
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत एका मतिमंद मुलीचे अपहरण करून धावत्या टॅक्सी मध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आधी या अल्पवयीन मुलीचे दादर वरून अपहरण केले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर मुलीला मालवणीला सोडले. 
 
या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींना अटक केली आहे. सलमान शेख आणि प्रकाश पांडे असे या आरोपींची नावे आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 पीडित मुलगी दक्षिण मुंबईत राहत असून तिचे घरच्यांशी काही कारणास्तव भांडण झाले.रागाच्या भरात ती घरातून निघाली आणि तिने घराच्या जवळूनच टॅक्सी घेतली. तिच्या मतिमंद असल्याचा फायदा घेत आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार प्रकाश पांडे यांनी तिच्यावर धावत्या टॅक्सित बलात्कार केला. नंतर तिला मालवणीला सोडले .नंतर तिची अवस्था पाहून पोलिसांनी तिची विचारपूस केल्यावर तिने सर्व सांगितले. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसानी आरोपींना ताब्यात घेतले. पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
 
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर अत्याचार होणे, विनयभंग होणे, अश्लील वर्तन करण्याच्या तक्रारी वाढत आहे. अत्याचार होण्याच्या बाबतीत मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाठोपाठ नागपूर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षितते बाबत प्रश्न उद्भवत आहे. 


Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

WhatsApp ची मोठी कारवाई, भारतात 66 लाखांहून अधिक खाती बंदी

महिला डॉक्टरने नगरसेवक प्रियकराला लग्नासाठी बोलावले, नकार दिल्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

महाराष्ट्र विधानपरिषदेत राहुल गांधींच्या 'हिंदू' वक्तव्यावर शिवीगाळ आणि प्रचंड गोंधळ

आता भगवान शिवाची प्रतिमा असलेले राहुल गांधींचे पोस्टर्स प्रदर्शित केले जातील

मेलबर्नहून दिल्लीला येणाऱ्या विमानात भारतीय तरुणीचा मृत्यू

सर्व पहा

नवीन

Weather Update News :राज्यातील या भागांना अति मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई महानगर क्षेत्रात होर्डिंगसाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार - उदय सामंत

फोनपे वापरकर्त्याची 5 लाख रुपायांची फसवणूक, आरोपींना अटक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटींमुळे विधवा आणि निराधार महिलांना लाभ मिळणार नाही?

राहुल गांधी यांच्या 'हिंदू' संदर्भातील विधानावरुन गदारोळ, पंतप्रधान मोदी आणि शाह काय म्हणाले?

पुढील लेख