Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mumbai-Pune Expressway झाला अधिक सुरक्षित; अपघाती मृत्यूदरात मोठी घट

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:15 IST)
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर  चार वर्षांमध्ये गंभीर अपघातांचे प्रमाणे ५२ टक्क्यांनी कमी झालं आहे. २०१६ पासून या मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसी, महाराष्ट्र महामार्ग पोलीस आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा तसेच सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांमधून ‘झिरो फॅटिलीटी कॉरीडोअर’ ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याचाच हा परिणाम आहे. एक्सप्रेसवेवर अपघातामध्ये प्राण गमवणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१६ साली या मार्गावरील अपघातांमध्ये १५१ जणांना प्राण गमवावा लागला. तर २०१९ मध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत या मार्गावरील अपघातामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या ८६ इतकी होती. २०२० मध्ये या मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या ६३ अपघातांमध्ये ६६ जणांचा मृत्यू झालाय. यासंदर्भातील आकडेवारी सेव्ह लाइफ फाऊंडेशनने जारी केलीय.
 
२०१६ पासूनच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या ५६ टक्क्यांनी कमी झालेली असली तरी करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याने त्यामुळे कमी झालेली अपघात संख्याही लक्षात घेण्यात आलीय. २०२० च्या पहिल्या आणि शेवटच्या तिमाहीमधील आकडेवारी लक्षात घेता अपघातांचे प्रमाण हे ५२ टक्क्यांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलंय. या कालावधीमध्ये सर्वसामान्यपणे वाहतूक सुरु असल्याने या मोहीमेचा परिणाम किती झाला हे मोजण्यासाठी हा कालावधी गृहित धरण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. २०२० च्या पहिल्या आणि शेवटच्या तिमाहीमध्ये एक्सप्रेसवेवर एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला. आकडेमोड केल्यास वर्षभरामध्ये ही सरासरी आकडेवारी ७२ असल्याचं गृहित धरलं तरी या मोहिमेला मिळालेलं हे यशच म्हणावं लागेल.
 
या मोहीमेबद्दल बोलताना एमएसआरडीसीचे उप व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी, “या मार्गावर होणारा प्रत्येक मृत्यू हा आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. करोनामुळे आपत्कालीन सेवांवर मोठा भार आला असला तरी आम्ही या मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या मार्गावर शून्य मृत्यूचं लक्ष्य साध्य करेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत,” असं म्हटलंय. या मोहीमेअंतर्गत एमएसआरडीसीने जवळजवळ ३००० हजार इंजिनियर्स प्रवास अधिक सुरक्षित होण्यासंदर्भातील काम करत आहेत. प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून पोलिसांकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. वाहतूक पोलीस शाखेचे अतिरिक्त निर्देशक भुषण कुमार उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहीमेमुळे रस्ते अपघातांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या ५२ टक्क्यांनी कमी झालीय. हे सर्व २०१६ ते २०२० दरम्यानच्या चार वर्षांमध्ये साध्य झालं आहे. या मार्गावर वेगाने जाणाऱ्या बस तसेच चुकीच्या पद्दतीने वाहन चालवणारे ट्रक चालक यांच्यावर पोलिसांचं विशेष लक्ष असल्याचं उपाध्याय सांगतात.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments