Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (21:19 IST)
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे.  महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २० हजारांहून दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्यावर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा दिला होता. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील रुग्णसंख्या वाढली तर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १५ हजार १६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ३३ हजार ६२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३८४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५२ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ६१ हजार ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.  आढळलेल्या १५ हजार १६६ रुग्णांपैकी १३ हजार १९५ रुग्ण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ६० हजार १४ कोरोना चाचण्या झाल्या आहे असून आतापर्यंत १ कोटी ३९ लाख २४ हजार ६०८ चाचण्या झाल्या आहेत. आज दगावलेल्या रुग्णांपैकी २ जणांचा दीर्घकालीन आजार होते. १ रुग्ण पुरुष आणि दोन रुग्ण महिला होत्या. या मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ४० ते ६० वर्षांवर होते.
 
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील रिकव्हरी रेट ९० टक्के असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ८९ दिवस आहे. मुंबईत सीलबंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ४६२ झाली आहे. मुंबईत काल, मंगळवारी १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments