suvichar

Mumbai Unlock Guidelines मुंबईकरांना दिलासा

Webdunia
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (11:31 IST)
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली केली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. 
 
सर्व गोष्टी खुल्या केल्या गेल्या असल्या तरी यासाठी पालिकेतर्फे लागू करण्यात आलेल्या नियम आणि अटींचं बंधन पाळण आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजनांचे नागरिकांना अनिवार्यपणे पालन करावे लागणार आहे. तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 
 
मुंबईत कोरोना परिस्थिती अटोक्यात आली असून काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्युदरात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील करोना निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंबंधी आज आदेश जारी केले आहेत.
 
आजपासून सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यात आली असून करोना लसीच्या दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. दोन डोस घेतलेल्या आणि १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नागपूर पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

समृद्धी महामार्गात 1150 कोटींचा घोटाळा! अंबादास दानवे यांचा आरोप

रिंकू सिंग टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला, वडिलांची प्रकृती गंभीर

महाराष्ट्र सरकार कडून कुरिअर कंपन्यांवरही MCOCA लादण्याचे संकेत

पुढील लेख
Show comments