Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिशा सालियन प्रकरणी गौप्यस्फोट करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला

Webdunia
मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (17:22 IST)
सध्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक राज्य सरकारला धारेवर धरून. टीका करत आहे.महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत मोर्चा काढला.आदित्य ठाकरे किल्ल्यावर पुतळा पाहण्यासाठी गेले असता नारायण राणेंचे कार्यकर्त्या एकमेकांशी भिडले. 

हा सर्व घटनाक्रम नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितला. ते म्हणाले, सध्या पुतळ्यावरून राज्यात राजकारण सुरु आहे. हे रचलेलं षडयंत्र आहे. एकनाथ शिंदे जेव्हा मातोश्रीवर पैशाच्या बॅगा घेऊन जायचे तेव्हा ते चांगले होते. नंतर ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांची सरकार मिंधे सरकार झाली. ते चांगले आहे अन्यथा त्यांनी तुमच्या विरोधात राज्यात अस्थिरता करण्यासाठी कधीचं  तडिपारचे नोटीस काढले असते. मी असतो तर असं केलं असत. असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशा सालियन प्रकरणी गौप्य स्फोट केला असून ते म्हणाले, या दिशा सालियनच्या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी मला दोनदा फोन केला आणि म्हणाले, साहेब हे प्रकरण वाढवू नका, लावून धरू नका. मी यावर म्हणालो, तुमच्या मुलाला उठण्या बसण्याच्या जागा ठरवून द्या. त्या फोटोत मंत्र्यांचे वाहन कसे होते? हे सांगावे असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

तसेच आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. असं करत ते राज्यात दंगली करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे छायाचित्रे  सोशल मीडियावर पसरवून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई करावी अशी मागणी नारायण राणेंनी राज्य सरकारला केली आहे. 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments