Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्षभरानंतर देखील अटल सेतूला रिस्पॉन्स नाही, कमी वाहनांच्या वाहतुकीची नोंद

Webdunia
मंगळवार, 14 जानेवारी 2025 (18:23 IST)
मुंबई आणी नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूच्या बांधकामाला एक वर्ष झाले आहे. या सेतूवरून वाहनांच्या कमी वाहतुकीची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला अटल सेतूवरून दररोज अंदाजे  56 हजार पेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होत होती. मात्र आता सेतूवरून दररोज 23 हजार पेक्षा कमी वाहनांची वाहतूकीची नोंद झाली आहे. 

अटल सेतूचे उदघाटन 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा सेतू मुंबईतील शिवडी-न्हावा शेवा याला जोडणारा असून अंदाजे 22 किलोमीटर लांबीचा आहे. या पुलाच्या उदघाटनांनंतर मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल होणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र मुंबईची वाहतूक स्थिती जशी होती तशीच आहे. या सेतूवर जास्त टोल असल्याने वाहनचालक जुन्या मार्गाचा वापर करत आहे. 
 
अटल बिहारी बाजपेयी शिवडी -न्हावा शेवा अटल सेतू अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल असून समुद्रावरील अंदाजे 16.5 किलोमीटर लांबीचा आणि जमिनीवर 5.5 किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (या वर्षाच्या शेवटी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे) दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या पुलाच्या बांधकामामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवासाचा वेळ कमी झाला आहे 
 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

नायजेरियन लष्कराच्या हवाई हल्ल्यात चुकून अनेक नागरिकांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टुरिझम पोलिस नेमण्यात येणार

महाकुंभात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शुभमन गिल पंजाबसाठी पुढील रणजी ट्रॉफी सामना खेळणार

पालघरमध्ये आयुर्वेदिक औषध कंपनीवर एफडीएच्या छापा, तीन लाखांची औषधे जप्त

पुढील लेख
Show comments