Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईला डोळा लागला आणि दहा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून झाला मृत्यू

child death
Webdunia
पनवेलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील घरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दहा महिन्यांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी आईला झोप लागली तेव्हा बाळ खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडून त्याचा मृत्यू झाला. आईला जाग आली तेव्हा 10 महिन्यांचा मुलगा प्लास्टिकच्या बादलीत उलटा पडलेला दिसला.
 
आशिक अल इमान असे या 10 महिन्यांच्या बाळाचे नाव आहे. आशिक अल इमानचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे आहेत. दुपारच्या सुमारास त्याची आई घरात झोपली असताना तो आईसोबत घरात होता. तो घरात खेळत होता. खेळता खेळता तो बाथरूममध्ये गेला आणि पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. काही वेळाने आई झोपून उठल्यानंतर तिला आशिक दिसला नाही. शोधा शोध केल्यानंतर तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला.
 
त्यानंतर तिने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या पतीला माहिती दिली. नवरा लगेच घरी आला आणि बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ नागरिकांना १० लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार, दिल्ली सरकारने आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली

Pahalgam terror attack आमदारांच्या कठोर शब्दांनी काँग्रेसला घेरले, भाजप म्हणाले नाव बदलून पाकिस्तानी पक्ष करा

Bank closed: 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत 3 दिवस बँका बंद राहतील

'परीक्षेत जानवे, मंगळसूत्रावर बंदी घालण्याचा आदेश चुकीचा', उपमुख्यमंत्री म्हणाले- यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो

पाकिस्तानकडून कुपवाडा आणि पूंछमध्ये पुन्हा गोळीबार,भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले

पुढील लेख
Show comments