Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (16:30 IST)
अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री वाढली. याच मैत्रीतून पुढे प्रेमाच्या भावनेतून तरुणीच्या आलेल्या मिस कॉलला ग्रीन सिग्नल समजून तरुणाने भावासोबत विवाहितेचे घर गाठले. मात्र, तिने गैरसमज झाल्याचे सांगून जाण्यास सांगितले. तेव्हा तरुणाने चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. तर त्याच्या भावाने बलात्काराचे व्हिडिओ केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जवळपास 200 हून अधिक सीसीटीव्ही तपासत अटकेची करवाई केली आहे. अनिल चव्हाण (19) आणि नीलेश चव्हाण (20) विलेपार्ले येथील रहिवासी आहे.  
 
धारावी परिसरात तक्रारदार 19 वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहण्यास आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास चव्हाण भावांनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. यावेळी एकाने या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

मुंबईत भारतातील पहिले आयआयसीटी असेल,सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल कार्ड सिस्टम सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

LIVE: मुंबईत भारतातील पहिले आयआयसीटी असेल मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, एनआयएला तपासात सहकार्य करण्याचे म्हणाले

चेन्नईला त्यांच्याच मैदानावर कोलकात्याकडून कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल

पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर केले, तो कॅनेडियन नागरिक असल्याचे सांगितले

पुढील लेख
Show comments