Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Webdunia
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (17:24 IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने सोमवारी पहाटे नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी चालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आलिशान कारमधून प्रवास करणारे लोक धरमपेठ परिसरातील एका बिअर बारमधून परतत असताना हा अपघात झाला.

वैद्यकीय तपासणीदरम्यान मद्यसेवनाचे प्रकरण शोधण्यासाठी रक्त तपासणी देखील केली जाईल.या प्रकरणी भरधाव वेगासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संकेत बावनकुळे आणि मानकापूर पुलावरून पळून गेलेल्या अन्य दोघांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या वर युबीटीचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या प्रकरणातील सर्व पुरावे पुसण्यात आले असून जो पर्यंत भाजपचे नेते फडणवीस गृह्मंत्रीपदावर आहे. राज्यात कोणत्याही प्रकरणात निष्पक्ष तपास होणार नाही. असं म्हणत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत नागपुरात दोघांना धडक देऊन गंभीर जखमी केले. या अपघातानंतर वाहनची नंबर प्लेट काढण्यात आली असा दावा संजय राऊतांनी केला आहे.ते म्हणाले, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

या अपघातानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑडी कारची नोंदणी मुलगा संकेत याच्या नावावर केल्याचे मान्य केले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पोलिसांनी कोणताही पक्षपात न करता या अपघाताचा सखोल आणि निष्पक्ष तपास केला पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी बोललो नाही. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबई बोट दुर्घटना: बचाव कार्यात हेलिकॉप्टर गुंतले, 77 प्रवाशांची सुटका, 2 ठार

मुंबईत सीबीआयची धडक,भ्रष्टाचार प्रकरणी दोन आयआरएससह 7 जणांना अटक

आंबेडकरांवरील वक्तव्यावरून झालेल्या वादावर अमित शहांनी मौन तोडलं

रशिया युक्रेन युद्ध: रशियासाठी लढणारे 200 हून अधिक उत्तर कोरियाचे सैनिक मारल्याचा दावा

पुढील लेख
Show comments