Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घरी जाऊन द्यावी

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (07:15 IST)
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घरोघरी जाऊन देण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयातील वकील ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना घरोघरी लस देण्यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना अनेक शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना लस घेण्यासाठी रुग्णालयात जाणे शक्य होणार नसल्याने त्यांना घरी जाऊन लस देणे हितकारक ठरेल असा दावा याचिकेत केला आहे.
 
तसेच त्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता पालिकेने त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी नोंदणी करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अपंग आणि विशेष नागरिकांना नोंदणी करणे, लस घेण्यासाठी अन्य व्यक्तीवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
 
यासाठी महापालिका प्रशासनाने पाचशे रुपये शुल्कदेखील घ्यावे असेही याचिकेतून नमूद करण्यात आले आहे. याचिकेत केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments