Marathi Biodata Maker

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (14:02 IST)
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही भोगावे लागत आहे.  या युद्धाचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. देशात सर्व गोष्टी महाग होताना मुंबईचा वडापाव या पासून सुटला नाही. आता मुंबईतला प्रसिद्ध असलेला गरिबांचा बर्गर म्हणजे वडापाव महागला आहे. त्यामुळे आता खवैय्यांना याचा फटका बसणार आहे. 

सध्या रशिया -युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. अशा कारणास्तव आता मुंबईत वडापावचे दर दोन ते पाच रुपयांपर्यंत वाढले आहे. वडापाव विक्रेत्यांचे म्हणणे आहे की  सध्या सिलिंडरच्या किमती वाढल्या आहे ते घेण्यासाठी 2400 रुपये द्यावे लागतात, मिरची 100 रुपये किलोच्या भावाने विकली जात आहे. रिफाईंड तेलासाठी 1500  ते 2400  रुपये मोजवे लागतात.  महागाई वाढल्यामुळे आता पूर्वीच्या किमतीत वडापाव देणं परवडणारे नाही म्हणून किमती वाढवल्या आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षण कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली

बीएमसीने मुंबईकरांसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत भरती-ओहोटीचा इशारा जारी केला

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकारचा कोणताही सहभाग नाही"

पुण्याच्या नवले पूल दुर्घटनेचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला, नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments